08 February 2015

Active Teachers Forum (ATF)

       Active Teachers Forum (ATF) हे 'राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ' सुरु होऊन तिनेक वर्षे झालीत. शिक्षकांच्या समृद्धीसाठी फोरम कार्यरतय. व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा अशा उपक्रमांसोबतच शाळेत काम करतानाचे भलेबुरे अनुभव असे अनेक गोष्टीचे शेअरिंग उत्तम पद्धतीने सुरू आहे. शाळा शाळातील मुलांचे शिकणे अधिक रंजक आणि अर्थपूर्ण होतेय, ही ATF ची सर्वात मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे.
          राज्यातील 26 जिल्ह्यातील 900 हून अधिक प्रयोगशील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील, अभ्यासक- कार्यकर्ते, उत्तम अधिकारी, काही संस्थाचे प्रतिनिधी अशा लोकांनी ATF राज्याच्या कानाकोप-यात पोचवलेय. I am because we are! हे फोरमचे ब्रीद वाक्य आहे...
                                 -भाऊसाहेब चासकर
ATF च्या फेसबुक पेज ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments: