17 March 2015

मराठी भाषेतून सरकारचे नवे वेबपोर्टल

(  मला आलेले  इमेल आपल्या माहितीसाठी कोणताही बदल न  करता देत आहे )
मा.प्रशांत क-हाडे,
जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेगाव ( खुर्द ) प.स.भद्रावती जि. प. चंद्रपूर 
सस्नेह नमस्कार .
   आपण शिक्षण क्षेत्रात समाज विकासाच्या प्रक्रियेत कटिबद्ध आहात. त्याबद्दल धन्यवाद. आपला भारत देश हा कृषिप्रधान आणि खेड्यांचा देश आहे, हे आपण  जाणताच आणि म्हणूनच आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे गरजेचे आहे.
   २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. याचा वापर करून जगातील अनेक देशांनी विकासाची गती पकडलेली आहे. आपल्या देशातही यामुळे अनेक अमुलाग्र बदल लोकांच्या जीवनात घडून येताना दिसताहेत. परंतु या माहिती तंत्रज्ञानाचे फायदे फक्त शहरी लोकांनाच जास्त होत आहे. त्या तुलनेत ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक इ. या लाभांपासून वंचित आहेत. याची मुख्य दोन कारणे म्हणजे
१.      माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे माहित नसते .
२.      आणि माहित असलेच तरी इंटरनेटवर उपलब्ध असणारी माहिती हि बहुतकरून इंग्रजी भाषेत असते.
  वरील सर्व गोष्टींचा विचार करून भारत सरकारने खास ग्रामीण जनतेसाठी ‘विकासपेडिया’ ( mr.vikaspedia.gov.in ) नावाचे एक बहुभाषिक वेब पोर्टल सुरु केले आहे.
 या पोर्टलचे खास वैशिष्ट्य म्हणजे
१.      याची माध्यम भाषा हि स्थानिक लोकांची मातृभाषाच असणार आहे. उदा.मराठी
२.      यावर स्थानिक लोक आपल्या भाषेत आपली मते, स्वतः केलेल्या यशस्वी पथदर्शी गोष्टी, माहिती या पोर्टलवर लिहू शकतीन तसेच ज्ञान व माहितीची देवाण-घेवाण करू शकतीन, चर्चा करू शकतीन, तसेच तज्ञांचा सल्ला विचारू शकतीन, बातम्या देऊ शकतात व ताज्या घडामोडीही जानू शकतात.
३.      पोर्टलवर उपलब्ध सर्व माहितीची सत्यता व विश्वासार्हता तपासली जाते.
४.      आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण समूहांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित क्षेत्र कृषी, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, उर्जा, ई-शासन इ. विषयांसंबंधी माहिती मराठी भाषेतून पोर्टल वर उपलब्ध आहे.
   आपणही http://www.shikshanmitra.in/ च्या माध्यमातून शिक्षणविषयक माहिती मराठी भाषेतून निर्माण केले आहे ती माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विकासपिडिया हे नक्कीच एक उत्कृष्ट माध्यम ठरेल, यात शंका नाही. या माहितीचा प्रसार सामान्य लोकांपर्यंत पोह्चला तर गरजू लोकांना त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवण्यास नक्कीच मदत होईन. यासाठी आपण खालील प्रकारे सहकार्य करू शकता..
१.       आपण निर्माण केलेली समाज उपयोगी माहिती यावर टाकू शकता, यासाठी आपल्याला मजकूर लेखक म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
२.       आपण उपलब्ध करून दिलेली माहिती आपल्याच नावाने व योग्य तो उल्लेख करूनच पोर्टलवर प्रकाशित होते.
३.      आपल्या प्रकल्प बैठकीमध्ये, कार्यक्रमांमध्ये पोर्टलविषयी माहिती लोकांना सांगू शकता.   
 धन्यवाद.
नीलिमा जोरवर
Nilima Jorwar

Vikaspedia.in

Watershed Organisation Trust

“The Forum” 2nd Floor,
Padmavati corner,Pune Satara Road,
Pune – 411009 Mob : 9423785436
Fax: +91-20-24213530