03 September 2015

ABP माझा कडून 'शिक्षणमित्र'चा सन्मान


'ABP माझा' ही  वृत्त वाहिनी दरवर्षी आयोजित आयोजित करत असते. या वर्षीच्या  या स्पर्धेमध्ये  माझ्या ‘शिक्षणमित्र’ www.shikshanmitra.in या शैक्षणिक ब्लॉग ( वेबसाईट ) ची निवड करण्यात आली.
 मराठी ब्लॉगर्स साठी एकमेव असलेली अभिनव अशी स्पर्धा “ब्लॉग माझा” 

शेती, साहित्य, नागरी समस्या, शिक्षण, पर्यावरण ई. विषयांना वाहिलेले मराठी ब्लॉग हे एकप्रकारे इंटरनेटवर मराठी भाषेच्या आश्वासक वाटचालीचे निदर्शक आहेत. या ब्लॉगना दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ‘ब्लॉग माझा’ ही स्पर्धा. महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे मोठा प्रतिसाद लाभला.

           ब्लॉग माझा स्पर्धेचं पुरस्कार वितरण यावर्षी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमात 31 ऑगस्ट 2015 रोजी आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ, मुंबई येथे राज्याचे शिक्षण मंत्री - मा. विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, व उद्योग जगतातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एबीपी माझा वरून करण्यात आले
.
'शिक्षणमित्र' वर प्रेम असणाऱ्यां आपणा सर्वांचे तसेच 'ABP माझा' चे मनापासून आभार . यानंतरही  असेच सहकार्य करत रहाल अशी आशा बाळगतो.